या वर्षात संजयने कारकिर्दीत पुढील पातळी गाठण्याच्यादृष्टिने महत्त्वपूर्ण पावले उचलली. त्याने ब्रिटनचे माजी —- विजेते प्रशिक्षक ग्रॅहॅम मिडीलटन यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक रॅली मालिकेच्या दिशेने पावले उचलली. त्याने मित्सुबिशी मिराज आर 5 ही अत्याधुनिक वेगवान कार खरेदी केली. आर 5 कारचे टेस्टींग आणि सराव करण्याच्या उद्देशाने मोसमाचे फेरनियोजन केले. त्यासाठी त्याने एपीआरसी मालिकेतील केवळ आशिया करंडक फेऱ्यांमध्ये भाग घ्यायचे ठरविले. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया व न्यू कॅलीडोनिया येथील फेऱ्यांत त्याने भाग घेतला नाही. हे तीन देश लांब असल्यामुळे आणि प्रवासात जास्त वेळ जाणार असल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला. अर्थात यामुळे मिळालेला वेळ त्याने तयारीसाठी खर्च केला.
कालावधी: 11-12 मार्च
देश: थायलंड
रॅलीचे नाव: प्री रॅली
फेरी: 1
संघ: इसुझु फुकेट
कार: इसुझु डीमॅक्स युटिलीटी व्हेईकल
क्लास: टी1 ओपन
नॅव्हीगेटर: थान्याफात मिनील (थायलंड)
एकूण अंतर: 250 किलोमीटर
स्पर्धात्मक अंतर: 150 किलोमीटर
कामगिरी: दोन किलोमीटर बाकी असताना इंजीन टर्बो बिघडल्यामुळे रॅली अपूर्ण (डीएनएफ)
एपीआरसीमधील पॅसिफीक विभागातील तीन (न्यू कॅलीडोनियाची फेरी होती का हे चेक करणे) फेऱ्यांत भाग घेतला नसल्यामुळे संजयला मोसमाच्या पहिल्या टप्यात वेळ मिळाला. त्यासाठी त्याने थायलंडमधील रॅलीच्या पहिल्या फेरीला प्राधान्य दिले. तीन महिन्यांच्या ऑफसीझननंतर तो सज्ज झाला. आशियाई क्रॉस कंट्री रॅलीसाठी कारचे टेस्टींग करण्याचा त्याचा उद्देश होता.
बँकॉकच्या उत्तरेला लोपबुरी (नाव चेक करणे) शहरात रॅलीचे आयोजन झाले. चार फेऱ्यांच्या मालिकेतील ही पहिली फेरी होती. संजयने 2010 व 2011 मध्ये या मालिकेतील काही फेऱ्यांत भाग घेतला होता.
इसुझु फुकेट संघाचे मालक तसेच मुख्य ट्युनर विचाई वात्ताहाविशुथ (नक्की नाव स्पेलींगनुसार चेक करणे) यांनी शॉक अॅब्सॉर्बर, गिअर बॉक्सच्या संदर्भात कार सुसज्ज केली होती.त्यामुळे संजय आशावादी होता. 2016 मध्ये संजयला आशियाई क्रॉस कंट्री रॅलीत कार दोन वेळा बिघडल्यामुळे अपयश आले होते. (चेक करणे) हा तांत्रिक बिघाड विचाई यांच्यासाठी मुख्य ट्युनर म्हणून जास्त निराशाजनक होता. त्यामुळे पुण्यात येऊन संजयची भेट घेऊन त्यांनी कार नव्याने सुसज्ज करण्याची योजना सादर केली. आशियाई क्रॉस कंट्रीत भाग घेणार असल्यामुळे त्याला या फेरीत खास प्रवेश म्हणून फ्री सीट देण्यात आले. रॅलीपूर्वी त्याला टेस्टींग मात्र करता आले नाही. त्यानंतरही सुसज्ज कारमुळे संजय मोठ्या आशेने रॅलीत सहभागी झाला.
संजयसाठी रॅलीची सुरवात चांगली झाली. शनिवारी दुसऱ्या स्टेजमध्ये संजय तिसऱ्या क्रमांकावर होता. दुसऱ्य क्रमांकावरील स्पर्धकापेक्षा तीन, तर आघाडीवरील स्पर्धकापेक्षा तो सात सेकंदांनी मागे होता. त्यामुळे पुढील स्टेजमध्ये त्याने विजय मिळविण्याच्या उद्देशाने वेग वाढविला. 13 किलोमीटर अंतराच्या या स्टेजमध्ये निम्मे अंतर त्याने सुरळीत पार केले. त्याला आठ सेकंदांची आघाडी सुद्धा मिळाली होती. केवळ दोन किलोमीटर अंतर उरले असतानाच दुर्दैव आड आले. इसुझू डीमॅक्सचा इंजिन टर्बो बिघडला. संजय-मिनीलने सर्व्हिस टीम येण्याची वाट पाहिली, पण त्यात बराच वेळ गेला. अखेरीस त्याला शर्यत सोडून द्यावी लागली.
संजयने सांगितले की, मिनीलचे इंग्रजी उच्चार समजायला थोडा वेळ लागला. त्यामुळे मला अनेकदा त्याच्या घड्याळावर अवलंबून राहावे लागले. (एक्स्प्लेन करणे…) या रॅलीचा एकूण अनुभव चांगला होता. थायलंडचे स्पर्धक या मार्गावर वर्षभर सराव करीत असतात. त्यांना हा मार्ग जवळपास तोंडपाठ असतो. अशा रॅलीने मोसमाचा प्रारंभ करणे महत्त्वाचे ठरले.
कालावधी: 13-14 मे
देश: मलेशिया
रॅलीचे नाव: मलेशिया रॅली मालिका
फेरी : 1
संघ : एमआरयू मोटरस्पोर्टस
कार : प्रोटॉन सॅट्रीया
क्लास: पी9
नॅव्हीगेटर: शॉन ग्रेगरी (मलेशिया)
एकूण अंतर: किलोमीटर
स्पर्धात्मक अंतर: किलोमीटर
कामगिरी: पी9 गटात दुसरा क्रमांक
स्पर्धात्मक सरावासाठी संजयने मलेशियन रॅलीची निवड केली. मलेशियन रॅली मालिकेतील पहिल्या फेरीत तो सहभागी झाला. तीन वर्षांच्या ब्रेकनंतर तो या रॅलीत सहभागी झाला होता. अनुभवी नॅव्हीगेटर शॉन ग्रेगरी त्याच्या जोडीला होता. संजयने एपीआरसी मालिकेतील मलेशियन रॅलीत भाग घेतला होता. गेली दोन वर्षे त्याचा नॅव्हीगेटर वेगळा होता, पण दिर्घ काळानंतर शॉनसह रॅली करताना त्याला अवघड गेले नाही, कारण बऱ्याच रॅली एकत्र केल्यामुळे त्यांच्यात पूर्वीपासून समन्वय आहे.
किलांग गुला येथील 23.01 किलोमीटर अंतराची स्टेज या रॅलीतील आव्हान होते. पी9 या सर्वाधिक चुरशीच्या गटात संजयने भाग घेला. यात सर्वाधिक दहा कार सहागी झाल्या होत्या. पर्लिस हा मलेशियाच्या उत्तरेकडील प्रांत आहे.
या रॅलीत संजयसमोर मुख्य आव्हान होते ते फोर-व्हील ड्राईव्ह ते टु-व्हील ड्राईव्ह असा बदल करण्याचे. फोर-व्हील ड्राईव्ह कार फार वेगवान असते, तर टु-व्हील ड्राईव्ह कार तुलनेने कमी वेगाने जाते.
हे आव्हान पेलताना संजयला शॉनच्या मलेशयातील अनुभवाची मदत झाली. त्यामुळे सुरवातीलाच संजयने दुसरा क्रमांक मिळविला. आघाडीवरील मलेशियाच्या अझ्रुल अझर नोर्बाकारी याची कार जास्त वेगवान असल्याचे आणि ही कार सुधारीत आवृत्ती असल्याचे संजयला जाणवले. संजयने दुसरा क्रमांक मात्र सोडला नाही. नोर्बाकारी गटात विजेता ठरला. संजय त्यापेक्षा पाच मिनिटे 41.8 सेकंदांनी मागे होता.
संजयसाठी पुनरागमनात पोडीयम मिळणे सुखद ठरले. त्याने केलेली प्रगती शॉन याच्यासाठी सुद्धा आनंददाक ठरली. शॉन म्हणाला की, संजय आता आणखी वेगाने आणि अचुकतेने पेस नोट््स काढतो. ड्रायव्हिंगचे कौशल्य त्याने वृद्धींगत केले आहे. संयम आणि शिकण्याच्या वृत्तीच्या जोरावर त्याने केलेली प्रगती कौतुकास्पद आहे.
निकाल:
1) अझ्रुल अझर नोर्बाकारी (मलेशिया)-थे यिए सिंग (मलेशिया) : 1 तास 48 मिनिटे 19.4 सेकंद, 2) संजय टकले (भारत)-शॉन ग्रेगरी (मलेशिया) 1ः54.01, 3) महंमद हश्रुल जमालुद्दीन (मलेशिया)-रोझीटा तुकीमीन (2ः00ः35.5)
कालावधी: 24-25-26 जून
देश: भारत
रॅलीचे नाव: महिंद्रा अडव्हेंचर मॉन्सुन चॅलेंज
फेरी:
संघ:
कार: महिंद्रा एक्सयुव्ही
क्लास: ओपन
नॅव्हीगेटर: महंमद मुस्तफा (भारत)
एकूण अंतर: 650 किलोमीटर
स्पर्धात्मक अंतर: किलोमीटर
कामगिरी: गटात आणि एकुण क्रमवारीतही पहिला क्रमांक
भारतामधील रॅली सर्कीटमध्ये मॉन्सुन चॅलेंज ही महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची रॅली मानली जाते. एका दशकाच्या कारकिर्दीत संजयने देशातील बहुतेक प्रमुख रॅली जिंकल्या, पण मॉन्सुन चॅलेंज जेतेपदाने त्याला हुलकावणी दिली होती. रॅलीचे टीएसडी स्वरुप आव्हानात्मक असते. टाईम-स्पीड-डीस्टन्स प्रकारच्या रॅलीत स्पर्धकांना काही मिनीटे आधी मार्गाचा तपशील असलेली पुस्तिका (ट्युलिप) दिले जाते. निर्धारीत अंतर कमी वेळेत पार केले तरी पेनल्टी बसते. त्यामुळे नॅव्हीगेटरच्या अचुकतेला ड्रायव्हरच्या कौशल्याची आणि नियंत्रीत ड्रायव्हिंगची जोड मिळणे आवश्यक असते. संजयप्रमाणेच मुस्तफा याला सुद्धा ही रॅली जिंकता आली नव्हती. तो संजयशिवाय इतर काही ड्रायव्हरबरोबर सुद्धा सहभागी झाला होता. त्यामुळे ड्रायव्हर-नॅव्हीगेटरची ही जोडी प्रेरीत झाली होती. 2012 मधील दुसरे, तर 2016 मधील पाचवे अशा कामगिरीत त्यांना सुधारणा करायची होती. रमणीय अशा पश्चिम घाट परिसरात पावसाळ्यातील वातावरणात कामगिरी उंचावण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते.
मंगळुरहून सुरु झालेला पहिला टप्पा मुर्डेश्वरला संपला. दिर्घ काळानंतर टीएसडी रॅली करीत असूनही संजयने अनुभव पणास लावला. 278.66 किलोमीटरच्या टप्यात त्याला केवळ 49 सेकंदांची पेनल्टी मिळाली, जी इतर दोन गटांत मिळूनही सर्वांत कमी होती.
मुर्डेश्वर ते पणजी असा दुसरा टप्पा होता. त्यात — स्टेजेसमध्ये संजय-मुस्तफा यांना केवळ दहा सेकंदांची पेनल्टी बसली. — स्टेजेसमध्ये त्यांनी झिरो पेनल्टी नोंदविली. संजय-मुस्तफाने सर्वांत कमी चार सेकंदांच्या पेनल्टीचा राष्ट्रीय विक्रम — मध्ये — रॅलीत नोंदविला होता. रॅलीच्या अंतिम टप्यात पाऊस लपाछपीचा खेळ खेळत होता. जेमतेम 100 मीटरपर्यंतचा मार्ग कोरडा दिसायचा आणि तो पार केल्यानंतर पुन्हा पावसाच्या सरी पडायच्या.
अशा आव्हानात्मक परिस्थितीत संजय-मुस्तफाने टीएसडी रॅलीचे आव्हान यशस्वीरित्या पेलले. त्यामुळे मॉन्सून चॅलेंज जेतेपदाचा करंडक आपल्या ट्रॉफी कॅबीनेटमध्ये आणण्यात हे दोघे यशस्वी ठरले. त्यांची एका मिनिटापेक्षा कमी वेळेची पेनल्टी सर्वोत्तम ठरली. इतर सर्व स्पर्धकांना किमान एका मिनिटापेक्षा जास्त पेनल्टी पत्करावी लागली.
निकाल:
एकूण क्रमवारी: 1) संजय टकले-महंमद मुस्तफा (00.59 सेकंद), 2) बी. पी. विनय-बी. एम. रवी कुमार (01ः15), 3) व्ही. संतोष कुमार-टी. नागराजन (1ः29).
ओपन क्लास: 1) संजय टकले-महंमद मुस्तफा (00.59), व्ही. संतोष कुमार-टी. नागराजन (1ः29), 3) रविंद्र कुमार-एम. सागर (1ः30)